गेली काही वर्ष आमच्या "उन्नयन" ह्या संस्थेच्या माध्यमातून सातत्याने
आनंदवन - हेमलकसा हे प्रकल्प अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न
करतो आहे. त्यानिमित्ताने आता अगदी आमटे परिवारच नाही तर प्रकल्पावरील इतर
कार्यकर्त्यांशीही एक वेगळंच भावनिक नातं जुळलं आहे. आणि कदाचित त्यामुळेच
ह्या सर्वच प्रकल्पांसाठी सतत काही ना काही करीत राहण्याची एक अनामिक
हुरहूर कायमचीच मनात असते.
आज आमच्या प्रकाश भाऊंच्या कार्यावर
चित्रपट प्रदर्शित होतोय. मी काही फार आवडीने चित्रपट बघणाऱ्यातला नाही. पण
हा चित्रपट सर्वस्वी वेगळा असणार आहे. चित्रपटाचा आशयही निराळा आणि तो
पडद्यावर साकारणारे कलाकारही त्याच जबरदस्त ताकदीचे. अर्थात प्रकाश भाऊंचं
काम एवढं प्रचंड आहे कि ते केवळ तीन तासाच्या चित्रपटाच्या चौकटीत बसवणं तसं कठीणच. पण कोणत्याही माध्यमातून का असेना, ते काम
जगापुढे येणं अधिक महत्वाचं.
जगापुढे येणं अधिक महत्वाचं.
त्यामुळेच
ह्या चित्रपटाशी दूरान्वयेही संबंध नसताना अगदी आपल्या घरचाच चित्रपट
प्रदर्शित व्हावा अशी ओढ लागली आहे. अगदी चित्रपटाची मित्रमंडळींमध्ये
भरपूर प्रसिद्धीही करून झाली आहे. आता तिकीट बारीवरही तो उत्तम चालवा हीच सदीच्छा!
प्रकाश भाऊंच्या कामाविषयी हळूहळू समाजात जागृती होते आहेच. ह्या चित्रपटाच्या निमित्ताने ते काम अधिक तीव्रतेने लोकांपर्यंत पोहोचेल ही अपेक्षा आहे.
चित्रपटाला शुभेच्छा तर आहेतच !!!