आषाढ अमावस्या उर्फ दीप अमावस्या अर्थात गटारी
तृशार्त धरतीला चिंब भिजवून आषाढ संपतो आणि हिरवागार प्रसन्न श्रावण सुरु होतो. "तमसो मा ज्योतिर्गमय" असा संदेश घेऊन येणारी ही आषाढातली
अखेरची अमावास्या. हीच अमावस्या दीप अमावस्या किंवा दिव्यांची अवस
म्हणूनही ओळखली जाते. घरातल्या सर्व दिव्यांची ह्यादिवशी पूजा केली जाते.
दुसऱ्या दिवशी पासून सुरु होणाऱ्या श्रावण महिन्याची तयारी म्हणून या दिवशी
घरातील दीप - निरांजन - कलश इत्यादी पूजेचे साहित्य धूऊन, घासून पुसून लख्ख
करून ठेवणे हा त्यामागचा मुख्य उद्देश. या दिवशी कणकेचे गूळ
घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे पक्वान्न म्हणून
खातात. अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात.
या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदिल, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात.
ह्या दिवसांत सगळी सृष्टी अगदी हिरवीगार झालेली असते. समुद्रावर जाण्यासाठी कोळी
बांधव नारळी पुनवेची वाट पाहत असतात. पावसाळ्याचा हा सुरुवातीचा काळ म्हणजे माशांचा प्रजोत्पादन काळ. माशांची
सशक्त पैदास होण्याकरता तसेच निसर्गाचा पूर्णपणे आस्वाद घेण्याकरता जणू
काही सृष्टीने मानवाला दिलेला एक छोटासा ब्रेकच असतो. वर्षभर न दिसणाऱ्या रानभाज्या
ह्याच सुमारास बाजारात येतात. विविध रानवनस्पती निरनिराळे रसस्वाद देतात. त्यांचा पोषकपणा शरीरास मिळणे जरुरीचे असते.
याच महिन्यात आपले बरेचसे सणही येतात. पावसाळ्याची सुरुवात म्हणजे रोगराईला आमंत्रणच. ह्या दिवसांत मांसाहार
पचायला जड जातो. आणि म्हणूनच श्रावणात मांसाहार वर्ज्य मानला जातो.
पण आजकाल ही परंपरागत दीप अमावस्या मागे पडून ह्याच दीप अमावास्येला गटारी
साजरी (???) करण्याची हिडीस प्रथा रूढ झाली आहे. ह्या दिवशी भरपूर मांसाहार
करायचा, यथेच्च दारू प्यायची आणि जमल्यास जिथे मिळेल त्या गटारात लोळण
घ्यायची ही सर्वसाधारण हा उत्सव साजरा करण्याची अभिनव पद्धत.
सतत काही ना काही पचवत असलेल्या पोटाच्या पचनेंद्रीयांना थोडा आराम मिळावा म्हणून सर्वच धर्मात उपवास करण्याची पद्धत आहे. पण मुस्लिम त्यांच्या रोजाचं किंवा ख्रिश्चन धर्मीय त्यांच्या उपवासाचं एवढं प्रदर्शन करताना कधी दिसत नाहीत. मग आपणच का?
आजच्या
विज्ञान युगात सांडपाणी वाहून नेणारी गटारे स्वच्छ ठेवली, त्यात घाण
तुंबू नये अशी व्यवस्था केली तर रोगराई आपोआप वाहून जाईल आणि प्रसन्न
श्रावण महिन्याचे आगमन होईल. ‘गटारी'ची आठवण ठेवायची ती त्यासाठी. सतत काही ना काही पचवत असलेल्या पोटाच्या पचनेंद्रीयांना थोडा आराम मिळावा म्हणून सर्वच धर्मात उपवास करण्याची पद्धत आहे. पण मुस्लिम त्यांच्या रोजाचं किंवा ख्रिश्चन धर्मीय त्यांच्या उपवासाचं एवढं प्रदर्शन करताना कधी दिसत नाहीत. मग आपणच का?
आता ही अमावस्या कशी साजरी करायची हे प्रत्येकाने ठरवायचं आहे, परंपरागत " दिव्यांची पूजा " करुन की अभिनव पद्धतीने " गटारात लोळण " घेऊन.
- वैभव प्रभुदेसाई
०९९६७५३४३९६
No comments:
Post a Comment